सरकारी नोकरीसाठी ग्रूप जॉईन करा

हिंदुस्तान कॉपर लिमिटेड मध्ये 103 पदांची भरती 2025

Hindustan Copper Limited Recruitment 2025: हिंदुस्तान कॉपर लिमिटेड मध्ये ऑनलाईन पद्धतीने भरतीची जाहिरात जाहीर झालेली आहे. या भरतीमध्ये एकूण १०३ पदांची जागा चार्जमन (इलेक्ट्रिकल), इलेक्ट्रिशियन ‘A’, इलेक्ट्रिशियन ‘B’ आणि WED ‘B’ साठी रिक्त आहेत. तर ऑनलाईन भरतीचे अर्ज हे 27 जानेवारी 2025 पासून सुरु झालेले आहेत आणि शेवटची अंतिम दिनांक 25 फेब्रुवारी 2025 रोजी आहे.

इच्छुक उमेदवारांना या भरतीसाठी लागणारी सर्व पात्रता खाली तपासून घ्यायचे आहे आणि त्यानंतर अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करावे.

पदाचे नाव व पदांची संख्या:

  • चार्जमन (इलेक्ट्रिकल)- 24 जागा
  • इलेक्ट्रिशियन ‘A’- 36 जागा
  • इलेक्ट्रिशियन ‘B’- 36 जागा
  • WED ‘B’- 07 जागा

शिक्षण:

  1. चार्जमन (इलेक्ट्रिकल)- (i) इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा + 01 वर्ष अनुभव + खाणकाम प्रतिष्ठानांना व्यापणारे वैध पर्यवेक्षी प्रमाणपत्र. किंवा ITI (Electrical) + 03 वर्षे अनुभव किंवा 10वी उत्तीर्ण +05 वर्षे अनुभव (ii) योग्य सरकारने जारी केलेल्या खाण प्रतिष्ठानांना समाविष्ट करणारे सक्षमतेचे पर्यवेक्षी प्रमाणपत्र.
  2. इलेक्ट्रिशियन ‘A’- (i) ITI (Electrical) + 04 वर्षे अनुभव किंवा 10वी उत्तीर्ण +07 वर्षे अनुभव (ii) सरकारी विद्युत निरीक्षकांकडून वैध वायरमन परवाना असणे आवश्यक आहे.
  3. इलेक्ट्रिशियन ‘B’- (i) ITI (Electrical) + 03 वर्षे अनुभव किंवा 10वी उत्तीर्ण+06 वर्षे अनुभव (ii) सरकारी विद्युत निरीक्षकांकडून वैध वायरमन परवाना असणे आवश्यक आहे.
  4. WED ‘B’- (i) डिप्लोमा + 01 वर्ष अनुभव किंवा BA/B.Sc./B. Com/BBA + 01 वर्ष अनुभव किंवा अप्रेंटिस + 03 वर्षे अनुभव किंवा 10वी उत्तीर्ण + 06 वर्षे अनुभव (ii) वैध प्रथम श्रेणीचे वाइंडिंग इंजिन ड्रायव्हर प्रमाणपत्र.

वयाची अट: 18 वर्ष ते 40 वर्षे या दरम्यान उमेदवारचे वयोमर्यादा असावे.

अर्जाची फी: General/OBC/EWS: 500/- रुपये आणि SC/ST साठी: शुल्क नाही.

वेतनश्रेणी: नियमानुसार.

नोकरी ठिकाण: राजस्थान.

ऑनलाईन (Apply Online) अर्ज: येथे क्लिक करा.

जाहिरात (Notification pdf): येथे क्लिक करा.

Leave a Comment